Integrating Technology into Studies
sakal
- डॉ. तन्मयी जोशी, असिस्टंट प्रोफेसर, रिसर्चर
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये आता आरोग्याचाही समावेश करण्यात आला असून, ते टिकवण्यासाठी औषधे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. औषधांशिवाय जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) या क्षेत्रात सातत्याने नवनवीन संधी निर्माण होत असून, त्याचे महत्त्व अबाधित आहे. बदलत्या काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रातील संधी ओळखल्या तर तो करिअर घडवण्याचा राजमार्ग ठरू शकतो.