

How intuitive thinking reveals deeper patterns beyond what is immediately visible.
Sakal
मृदुला अडावदकर (सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ)
नव्या वाटा
मागच्या भागात आपण गणित शिकण्याचा दहा कलमी कार्यक्रम पाहिला. त्यामध्ये उल्लेख केलेल्या गणिती क्षमता जशा-जशा विकसित होत जातात, तशी-तशी एक महत्त्वाची क्षमताही नकळत विकसित होत जाते ती म्हणजे ‘इंट्यूटिव्ह विचार क्षमता!’ एक अगदी सोपं उदाहरण. १० आणि २५ या दोन संख्यांशी संबंधित तिसरी संख्या कोणती? उत्तर ः ५. आता आपल्या मनात कुठून आलं हे उत्तर? कोणी याला ‘अंतर्ज्ञान’ म्हणतात, कोणी ‘सिक्स्थ सेन्स’ म्हणतात. प्रत्येकाचा ‘आतला आवाज’ विकसित होत जाण्याची ही प्रक्रिया असते. चला, आपणही गणिताच्या वाटेने चालताना आपल्या आतल्या आवाजाचा शोध घेऊ या.