
आयटी सेक्टर युवकांवर ‘मेहरबान’; ३ हजारांवर विद्यार्थ्यांना नोकरी
नागपूर : गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी (IT sector) विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, शहरातील तीन नामांकित महाविद्यालयातील तीन हजारांवर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी प्लेसमेंट देत (Jobs for over 3000 students) सर्वाधिक वीस लाखांचे पॅकेज (Twenty lakh package) दिले आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे आयटी क्षेत्रातील आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात (Engineering course) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कील अभावी नोकरी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये त्यांना योग्य प्लेसमेंट मिळत नसल्याचे दिसून आले. मात्र, काही दिवसांत विदर्भातील तीन नामांकित महाविद्यालये आणि इतरही काही महाविद्यालयांनी आपल्या दर्जात सुधारणा केली असून कौशल्य विकासावर आधारित विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करीत त्यांना चांगले प्लेसमेंट दिले ल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, कोरोनापूर्वी जेवढ्या नोकऱ्या मिळत नव्हत्या, आता त्यापेक्षा अधिक युवकांना नोकऱ्या मिळत आहे. एका-एका युवकाच्या हाती ३-३, ४-४ नोकऱ्यांचे पर्याय आहे. दोन महिन्यांपासून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या मुलाखती होत आहे. त्यातून कंपन्यांद्वारे चांगले पॅकेजही मिळविले आहे. यामध्ये प्रामुख्याने विशेषत: आयटी, कॉम्प्यूटर सायन्स आणि मॅकेनिकल शाखेतील विद्यार्थ्यांना कंपन्यांद्वारे प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच महाविद्यालयांमधील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० ते ८० टक्के युवकांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकऱ्याही मिळाल्या आहे.
हेही वाचा: ‘या’ देशांना भेट दिल्यास तुम्हाला वाटेल श्रीमंत झाल्यासारखं
अमेझॉनचे २० लाखांचे सर्वाधिक पॅकेज
महाविद्यालयांशी जुळलेल्या लोकांनी सांगितले की, तिन्ही कॉलेजमध्ये सर्वाधिक पॅकेज अमेझॉनकडून दिले जात आहे. वायसीसीईमध्ये १८ लाखांचे पॅकेज सर्वाधिक आहे. रायसोनीमध्येही अमेझॉनने १८ लाख पॅकेज देऊन प्रतिभावंत युवकांची निवड केली आहे. रामदेवबाबामध्ये अमेझॉनकडून २० लाखांची ऑफर देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी या पॅकेजमध्ये सिलेक्ट झाले आहे.
कमी गुण आल्यास नोकरीसाठी संघर्ष
अन्य कॉलेजमध्ये सामान्य एनआरएफ रँकिंगसह अन्य कॉलेजमध्येही कंपन्यांकडून मुलाखती घेतली जात आहे. परंतु, अशा कॉलेजमध्ये जास्त यश येताना दिसत नाही. चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. परंतु, कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा कॉलेजमध्ये कंपन्यांची संख्याही जास्त नाही. त्यामुळे पर्यायही कमी मिळत आहे.
वायसीसीईमध्ये आतापर्यंत १ हजार १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड विविध आयटी कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे. सरासरी पॅकेज ५.५ लाख रुपये आहे. जे. पी. मॉर्गन या कंपनीने १४ लाखांचे सर्वाधिक पॅकेज दिले आहे. कंपनीने याच सरासरीत ९ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. सहज साफ्टवेयरचे सरासरी पॅकेज ११ लाखांच्या दरम्यान राहिले. टीसीएस, विप्रो, इंफोसिस, परसिस्टेंट, पीसीडब्ल्यू, कॅपजेमिनी, काग्निजेंट, एक्वेंचर सारख्या कंपन्याही कॅम्पसच्या माध्यमातून प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे.- निरज वखरे, प्लेसमेंट इंचार्ज, वायसीसीई
कॉलेज प्लेसमेंट सरासरी पॅकेज सर्वाधिक पॅकेज
रामदेवबाबा ७०० - ७ लाख २० लाख
वायसीसीई ११०० - ५.५ लाख ते १८ लाख
रायसोनी ८०० - ५ ते ६ लाख १८ लाख
Web Title: It Sector Jobs For Over 3000 Students Twenty Lakh Package Engineering Course
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..