पुणे - राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी तीन जुलै रोजी जाहीर होणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत.