esakal | ITI मेरीटने गाठली शंभरी; सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कल
sakal

बोलून बातमी शोधा

ITI Admission

ITI मेरीटने गाठली शंभरी; सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कल

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (ITI) अंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि खासगी औ‌द्योगिक प्रशिक्षण सं‍स्थेतील आयटीआय मधील प्रवेशाची (ITI Admissions) गुणवत्ता यादी संचालनालयाचे जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीत मेरीटने (ITI Merit List) शंभरी गाठली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची (students priority) आयटीआयच्या प्रवेशाकडे आपला कल दाखवल्याचे या गुणवत्ता यादीत दिसून आले आहे.

हेही वाचा: 'जिद्द असावी तर अशी; व्यंगत्वावर मात करणाऱ्या शिक्षिकेची प्रेरणादायी कहाणी'

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेतलेल्या १०१ आणि ९० टक्केहून अधिक गुण घेतलेल्या तब्बल १ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशाला पसंती दिली आहे. तर दुसरीकडे पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये केवळ ७ मुली असून एकुण मेरिटच्या यादीत मुलींची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात असलेल्या ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी आयटीआय असून या सर्व आयटीआयमध्ये एकुण १ लाख ४८ हजार २९६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी १५ जुलैपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली होती. त्यासाठी काल संचालनालयाकडून अर्जांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज आलेल्या अर्जातील २ लाख ५८ हजार ५६८ जणांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

यामध्ये ९० ते ९९ टक्के गुण घेतलेल्या तब्बल १ हजार विद्यार्थ्यांचा तर १०० टक्के गुण मिळवलेल्या १०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ८० ते ९० टक्केच्या दरम्यान दहावीत गुण मिळवलेल्या १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनीही आयटीआयच्या विविध ट्रेडसाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असून त्यांची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून ही यादी ट्रेडनिहाय प्रवेशाची निवड यादी सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी संबंधित आयटीआयमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

loading image
go to top