
जपानमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जपान सरकारने MEXT(शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय) शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५ साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या शिष्यवृत्तीद्वारे भारतीय विद्यार्थी जपानमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात. ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल ज्यांना जपानी भाषा आणि संस्कृतीची माहिती आहे आणि आता ते जपानमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकू इच्छितात.