जपानी भाषेचे पगारावर आणि संधीवर कसा परिणाम होतो ते पाहूया

सुजाता कोळेकर
Thursday, 14 May 2020

जपानी भाषा ही मराठीसारखी असल्यामुळे ती शिकायलाही सोपी जाते, परंतु जपानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत, हेच आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नसते.

जपानी भाषा येत असल्यामुळे मला जपानला जाण्याची आणि जपानी कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी दहावीनंतर लगेच जपानी भाषा एक छंद म्हणून शिकायला सुरुवात केली होती. माझे आयुष्य आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जपान आणि  जपानी लोकांमुळे खूप सकारात्मक झाला, आर्थिक फायदा झाला, ही मोठी जमेची बाजू आहेच. जपानी भाषेबद्दल लिहिताना काही इंजिनिअरिंग आणि तशा प्रकाराच्या (Bsc etc) इतर कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नांना या लेखामधून उत्तरे मिळतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रामध्येच इंजिनिअरिंगची जवळपास ४०० कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये कमीत कमी ६० विद्यार्थी आहेत. हे सगळे विद्यार्थी साधारण सारख्याच अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करतात. 

त्यानंतर कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी आलेल्या कंपन्यांना सगळे सारखेच वाटतात, त्यामुळे त्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना संधी मिळते. जपानच्या भारतामध्ये १४००पेक्षा अधिक कंपन्या आहेत. जपानचे बरेच काम भारतात असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, टीसीएस वगैरे करत आहेत आणि जपानने भारतात १२ इंडस्ट्रिअल इस्टेट्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. तसेच जपानमध्ये तरुण काम करणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे जपानमध्ये जपानी शिकले, की संधी लवकर मिळते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सगळ्या संधी आपल्यासमोर असताना विद्यार्थी अजूनही इतर देशाचाच विचार करतात. त्या देशांमध्ये स्पर्धा खूप आहे आणि संधी कमी आहेत. जपानी कंपनीमध्ये काम करायचे असल्यास जपानी येणे खूप महत्त्वाचे आहे. जपानी भाषा ही मराठीसारखी असल्यामुळे ती शिकायलाही सोपी जाते, परंतु जपानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत, हेच आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नसते. 

मागील लेखामध्ये जपानी भाषेची परीक्षा आणि वेगवेगळ्या लेव्हल्स बद्दल मी लिहिले आहे. आता त्या वेगवेगळ्या लेव्हल्सचा पगारावर आणि संधीवर कसा परिणाम होतो ते पाहूया. 

जपानी भाषा ही स्पेशल स्किल आहे. त्यामुळे पगारामध्ये लँग्वेज प्रीमियम मिळतो. भाषा बोलता, लिहिता आणि वाचता पण यायला हवी. 

N५ केलेल्या विध्यार्थ्यांना काही कंपन्या प्राधान्य देऊन घेतात आणि त्यांना भाषेचे पुढील ट्रेनिंग कंपनीमध्ये दिले जाते. २५-३० टक्के जास्त पगार मिळतो. 

N४ केलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील कंपन्यामध्ये साधारण ४०-५० टक्के जास्त पगाराची नोकरी मिळते. 

N३ केलेल्या विद्यार्थ्यांना जपानी कंपन्यामध्ये साधारण ८०-१०० टक्के जास्त पगाराची नोकरी मिळते. 

N२ केलेल्या विद्यार्थ्यांना एका वेळी अनेक नोकऱ्या पण मिळू शकतात. 

इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकल्यावर वरील संधी मिळतात. 

जपानी येत असल्यास इंग्रजीवर प्रभुत्व असण्याची गरज असते, ही एक जमेची बाजू आहे. जपानी भाषा शिकताना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे आणि शिकवणारे शिक्षक कुशल असणे गरजेचे आहे 

सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese language affects salaries and opportunities