जेईई अॅडव्हान्समध्ये मृदुल अग्रवाल प्रथम; नीरजा पाटील मुंबईत अव्वल | Education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JEE ADVANCE

जेईई अॅडव्हान्समध्ये मृदुल अग्रवाल प्रथम; नीरजा पाटील मुंबईत अव्वल

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : देशातील आयआयटी (IIT) मधील विविध प्रवेशासाठी महत्त्वाची समजली जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचा (JEE Advance exam result) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूरने जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड म्हणजेच जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत यामध्ये आयआयटी दिल्ली झोनचा मृदुल अग्रवाल (mridul Agarwal) याने या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह प्रथम क्रमांक (First rank) पटकावला आहे. त्याला ३६० पैकी ३४८ गुण म्हणजेच ९९.६६ टक्के गुण मिळाले आहे. विशेष म्हणजे २०११ नंतरचा हा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा सार्वधिक स्कोअर आहे. तर मुंबईचा कार्तिक नायर (kartik nair) आणि गार्गी बक्षी (Gargi bakshi) राज्यात अव्वल नीरजा पाटील (Neeraja Patil) मुंबईत अव्वल ठरले आहेत.

हेही वाचा: एचआयव्हीबाधित असलेल्या आरोपी महिलेला सुधारगृहात परत पाठवण्याचे आदेश कायम

मुलींमध्ये आयआयटी दिल्लीचीच काव्या चोप्रा प्रथम आली आहे. तिला ३६० पैकी २८६ गुण प्राप्त झाले आहेत. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड २०२१ च्या पेपर १ आणि पेपर २ मध्ये एकूण १,४१,६९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी एकूण ४१,८६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मुंबईतून कार्तिक नायर हा देशात सातवा आणि राज्यात पहिला आला आहे. तर मुंबईची गार्गी बक्षी राज्यात अव्वल आली आहे. तर नीरजा पाटील ही देशात २६६ आणि मुंबईत पहिली आली आहे. आयआयटी प्रवेश २०२१ साठी ३ ऑक्टोबर या दिवशी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आला.

जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त दोन लाख २० हजार विद्यार्थीच ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेत बसू शकतात आणि या परिक्षेत उत्तीर्णपैकी पहिल्या एक लाख विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर विभागाच्या छाप्यातून १८४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड

दरम्यान, मला अभ्यास करायला खूप आवडतो त्यामुळे मी दोन वर्षे अभ्यास खूप एन्जॉय केला असे कर्तिकने सांगितले. इयत्ता नववीपासून शिकवणी लावली होती. मधून मधून अभ्यासातून ब्रेक घेऊन मानसिक आणि शारीरिक थकवाही दूर करायचो असेही कार्तिक सांगतो. कार्तिकची आई पार्ले येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे तर वडील आयटी कंपनीत कामाला आहेत. कार्तिकला पुढे आयआयटी मुंबईतून कम्प्युटर इंजिनीअरिंग करण्याची इच्छा आहे. तर मुंबईतून पहिली आलेली नीरजा पाटील हीलाही आयआयटी मुंबईतून कम्प्युटर इंजिनीअरिंग करायची इच्छा आहे. त्यासाठी तिने ही माहिती दिली.

वेगवेगळ्या राज्यांच्या बोर्ड परिभांमध्ये जेईई परिक्षेमुळे कुठली अडचण होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा आणि जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने परिक्षा देता यावी आणि आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये, दुसरा टप्पा मार्चमध्ये पार पडला. त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

loading image
go to top