esakal | कोरोनाचा प्रादुर्भाव; मे महिन्यातील JEE परिक्षा स्थगित

बोलून बातमी शोधा

JEE
कोरोनाचा प्रादुर्भाव; मे महिन्यातील JEE परिक्षा स्थगित
sakal_logo
By
नामदेव कुंभार

May session for JEE (Main) 2021 has been postponed : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अनेक राज्यातील विद्यार्थांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. तर काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) मे महिन्याअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात (JEE Exam postponed) आली आहे. एप्रिलमधीलही परिक्षा रद्द करण्यात आल होती. एनटीएने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना जारी केली आहे. त्याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही ट्वीट करून परीक्षा पुढे ढकलली असल्याचे स्पष्ट केले. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार असल्याचे 'एनटीएन'ने निवेदनात नमूद केले. फेब्रुवारी महिन्यात सहा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी तर मार्च महिन्यात पाच लाख 56 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. (JEE Main 2021 May session postponed)

हेही वाचा: बाबांचा स्कोअर १४ अन् आईला मधुमेह, घरातील ७ सदस्यांना कोरोना; पण भीती न ठेवता केली मात

यंदा जेईईची (JEE) मेन परीक्षा चार सत्रांत घेण्यात येत आहे. पहिले सत्र 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचा निकाल 7 मार्च रोजी लागला. त्याच वेळी, एनटीए सत्र 16, 17 आणि 18 मार्च रोजी आयोजित केली होती. आता मे महिन्यात होणारी जेईई (JEE) परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.