esakal | 'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Main

'जेईई मेन'च्या तिसर्‍या सत्रासाठी प्रवेशपत्र 15 जुलै 2021 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

'JEE Main'च्या तिसर्‍या सत्रासाठी 15 जुलैला जाहीर होणार Admit Card!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

JEE Main Admit Card 2021 : 'जेईई मेन'च्या (JEE Main) तिसर्‍या सत्रासाठी प्रवेशपत्र 15 जुलै 2021 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) म्हणजेच, एनटीए एप्रिल सत्र परीक्षेसाठी 15 जुलै रोजी अधिकृत वेबसाइटवर (jeemain.nta.nic.in) प्रवेशपत्र जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जे उमेदवार तिसर्‍या टप्प्यातील परीक्षेला बसणार आहेत, ते अधिकृत पोर्टलवर तपशील देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली, नसली तरी उमेदवारांना जेईईच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिसर्‍या सत्राची परीक्षा 20 ते 25 जुलै 2021 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेय. (JEE Main Admit Card 2021 NTA Is Likely To Release The Admit Card For Jee Main 2021 Third Session By July 15)

या शिवाय, चौथ्या टप्प्यात अर्थात मे सत्र परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2021 आहे. त्याशिवाय मे सत्रातील जेईई मुख्य परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारास एकाच सत्रात किंवा एकापेक्षा अधिक सत्रासाठी एकाचवेळी अर्ज करण्याचा आणि त्यानुसार अर्ज फी भरण्याचा पर्याय आहे. तसेच तृतीय सत्राची परीक्षा B.E/ B. Tech साठी घेतली जाईल, तर चौथ्या सत्रासाठी .E/ B. Tech आणि B. Arch / बी परीक्षांचे नियोजन केले जात आहे. एनटीएच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दोन्ही सत्रांसाठी जेईई मेन प्रवेश पत्राच्या रिलीज तारखेची माहिती अधिकृत वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: औरंगाबाद, नाशिकसह 'या' केंद्रांवरील 'SBI'ची लिपिक परीक्षा ढकलली पुढे

फॉर्म दुरुस्तीस प्राधान्य

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एप्रिल / मे सत्रासाठी अर्ज केला आहे, ते अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या अंतिम मुदतीनुसार, त्यांचे फॉर्म दुरुस्ती करु शकतात. यासाठी 12 जुलै 2021 ही तारीख निश्चित केली असून अर्ज भरल्यानंतर कोणतीही दुरुस्ती विंडो उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही प्रश्न असल्यास उमेदवार 01140759000 किंवा jeemain@nta.ac.in यावरती ईमेल करू शकतात.

JEE Main Admit Card 2021 NTA Is Likely To Release The Admit Card For Jee Main 2021 Third Session By July 15

loading image