esakal | यूजीसीची JEE Main, NEET PG परीक्षा रद्द; NET परीक्षाही पुढे जाणार?

बोलून बातमी शोधा

JEE Main And Neet PG
यूजीसीची JEE Main, NEET PG परीक्षा रद्द; NET परीक्षाही पुढे जाणार?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

सातारा : UGC NET May 2021 : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या टप्प्यात देशभरात होणाऱ्या संक्रमणाची वाढती धास्ती लक्षात घेता केंद्र आणि राज्य मंडळाच्या परीक्षा, प्रवेश आणि स्पर्धा परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) देशभरात मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या यूजीसी नेट परीक्षा स्थगित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, युजीसी नेट परीक्षेच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल व एनटीएच्या महासंचालकांकडे या परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाव्दारे केली आहे. यापूर्वी एनटीएद्वारे घेण्यात येणारी जेईई मेन 2021 आणि एनबीईद्वारे घेतली जाणारी एनईईटी पीजी परीक्षाही तहकूब केली गेली आहे.

यूजीसी नेट परीक्षा होणार 2 ते 17 मे रोजी

एनटीए डिसेंबर 2020 अंतर्गत मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेच्या वेळापत्रकानुसार 2 ते 7 मे, 10 ते 12, 14 मे आणि 17 मे 2021 दरम्यान ही चाचणी घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट परीक्षा भारतीय विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी उमेदवारांच्या पात्रता निश्चितीसाठी एकूण 84 विषयांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने एनटीएतर्फे घेण्यात येते. यूजीसी नेट जून 2020 ची परीक्षा कोरोना साथीच्या आजारामुळे पुढे ढकलल्यानंतर सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती आणि ती नोव्हेंबरपर्यंत चालली. यामुळे मे 2021 मध्ये डिसेंबर 2020 ची परीक्षा पुढील महिन्यात घेतली जाणार आहे.

SBI Recruitment 2021 : संपूर्ण देशभरात SBI ची बंपर भरती; नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

यूजीसी नेटचे प्रवेश पत्र अद्याप जाहीर नाही!

दरम्यान, यूजीसी नेट मे 2021 (डिसेंबर 2020) परीक्षेचे प्रवेश पत्र एनटीएकडून अद्याप जाहीर केलेले नाही. असे मानले जाते की, जर परीक्षा पुढे ढकलण्यात आली नाही तर यूजीसी नेट प्रवेश पत्र या आठवड्यात दिले जाऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी यूजीसीच्या ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवरती वेळोवेळी लक्ष ठेवण्याचे आवाहन संबंधित व्यवस्थापनाने केले आहे.