esakal | JEE Mains 2021 : जेईई मुख्य परीक्षेच्या चौथ्या सत्राच्या तारखा ढकलल्या पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Main

JEE Mains 2021 : जेईईच्या चौथ्या सत्राच्या तारखा ढकलल्या पुढे

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : JEE मुख्य परीक्षेच्या चौथ्या सत्राच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्या तारखांनुसार आता २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर रोजी या परीक्षा होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी ही घोषणा केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) तिसऱ्या आणि चौथ्या सेशनमध्ये चार आठवड्यांचा गॅप ठेवण्याची सूचना केली होती, त्यानुसार हा बदल करण्यात आल्याचं प्रधान यांनी सांगितलं.

देशभरातून ७.३२ लाख उमेदवारांनी JEE मुख्य परीक्षेच्या चौथ्या सत्रासाठी यापूर्वीच नोंदणी केलेली आहे. ही नोंदणी प्रक्रिया आता पुढे आणखी सुरु ठेवण्यात आली असून २० जुलैपर्यंत चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु असणार आहे.

JEEच्या मुख्य परीक्षेच्या तिसऱं सत्र २० ते २५ जुलै दरम्यान पार पडणार होतं. तर चौथं सत्र आता २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान होणार होतं. मात्र, कोविडमुळं या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

loading image