

Jharkhand CMEGP Scheme Offers Loans up to ₹25 Lakh and Subsidy up to ₹5 Lakh for Youth Entrepreneurs
esakal
स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्माण करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी झारखंड सरकारची 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना' (CMEGP) महत्त्वाची ठरू शकते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपासून २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जावर ४० टक्क्यांपर्यंत अनुदान, कमाल ५ लाख रुपयांपर्यंत, मिळण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि दिव्यांग प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आधार दिला जातो.