Govt Jobs : 12वी पास तरूणांकरिता 4500 सरकारी नोकऱ्या! कसा-कुठे कराल अर्ज? वाचा सविस्तर

job govt for 12th pass 4500 vacancies in central government departments apply at ssc nic in
job govt for 12th pass 4500 vacancies in central government departments apply at ssc nic in sakal

Govt Jobs for 12th Pass 2023 : केंद्रीय विभाग आणि मंत्रालयांमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, संबंधित विभाग आणि कार्यालयांमध्ये लेव्हल-2, लेव्हल-4 आणि लेव्हल-5 च्या सुमारे 4,500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी जाहिरात केलेल्या 4,500 सरकारी नोकऱ्यांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) /ज्यूनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (ग्रेड A) यांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांची निवड स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे घेण्यात येणार्‍या संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा 2022 द्वारे केली जाईल. या परीक्षेची अधिसूचना आयोगाने 6 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

job govt for 12th pass 4500 vacancies in central government departments apply at ssc nic in
Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ

अर्ज करण्याची तारीख कधीपर्यंत आहे?

SSC द्वारे जाहीर केलेल्या या 4.5 हजार पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले 12वी पास उमेदवार आणि कमाल वय 27 वर्षे असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

अर्जासाठी वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना प्रथम होमपेजवर दिलेल्या लॉगिन सेक्शनमध्ये नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करावे लागेल. यानंतर, उमेदवार संबंधित परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकतील. अर्जाची फी 100 रुपये आहे. ही फीस महिला उमेदवारांनी, SC, ST, दिव्यांग आणि माजी कर्मचारी श्रेणीतील उमेदवारांनी भरावी लागणार नाही.

job govt for 12th pass 4500 vacancies in central government departments apply at ssc nic in
Avatar 2 : जगातला सर्वात महागडा चित्रपट! अंडरवॉटर शूटसाठी झाला 'इतका' खर्च

निवड अशी होईल?

एसएससी द्वारे सीएचएसएल परीक्षा 2022 दोन टप्प्यात घेतली जाईल - टियर 1 आणि टियर 2. टियर 1 कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT) मोडमध्ये घेतली जाईल आणि तिचा कालावधी 60 मिनिटे असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या विषयांमधून 25-25 प्रश्न विचारले जातील.

प्रत्येक उत्तरासाठी 2 गुण असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील. टियर 1 मधील विविध श्रेणींनुसार निर्धारित किमान गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्पा टियर 2 साठी बोलावले जाईल, अधिक तपशीलांसाठी भरती सूचना पहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com