IIT Recruitment | आयआयटीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT

IIT Recruitment : आयआयटीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यकाच्या एकूण ३२ जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइट iitb.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२३ आहे. (IIT Bombay Recruitment 2022) हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Apprentice Jobs : 'आयआयटी कानपूर'मध्ये प्रशिक्षणार्थी जागांवर भरती

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ३२

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २३ डिसेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे सामाजिक शास्त्र / इंग्रजीमध्ये एमए किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराने सामाजिक शास्त्र / इंग्रजीमध्ये बीए किंवा समकक्ष पदवी मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: IIT Kanpur : पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; पगार ६९ हजार

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४८ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत या प्रक्रियेतून जावे लागेल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना २५,२०० ते ५५,४०० रुपये पगार देण्यात येईल.

अर्ज शुल्क

उमेदवाराला अर्जाचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.