Jobs : दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पगारासह जाणून घ्या सविस्तर माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!जाणून घ्या सविस्तर
दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर

10वी-12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : तुम्ही दहावी, बारावी पास असाल तर तुमच्यासाठी नोकरीची (Jobs) सुवर्णसंधी चालून आली आहे. सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेडने (Central Coalfields Ltd. - CCL) अप्रेंटिसच्या 539 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पदांसाठी नियुक्‍त्या करायच्या आहेत. यामध्ये इलेक्‍ट्रिशियन, फिटर, COPA, शिनिस्ट, टर्नर, प्लंबर आणि इतर पदांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: चालू आर्थिक वर्षात SBI ला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा!

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित क्षेत्रातील दहावी, बारावी आणि ITI उत्तीर्ण असावेत. तथापि, वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज करण्यापूर्वी त्यांनी अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना पूर्णपणे वाचून तपासावी, कारण अर्जामध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

या तारखा लक्षात ठेवा

  • अधिसूचना जारी तारीख : 20 नोव्हेंबर 2021

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2021

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 5 डिसेंबर 2021

  • भरती परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल

अधिकृत अधिसूचनेनुसार, विविध ट्रेडमधील अप्रेंटिस अधिनियम -1961 सुधारित 2017 अंतर्गत एक वर्ष 2020-21 च्या व्यावहारिक प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मोहिमेची अधिसूचना 20 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2021 आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर अधिक तपशील पाहू शकतात. सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडलेल्या उमेदवारांना रांची, झारखंड येथे नियुक्ती दिली जाईल.

हेही वाचा: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी हालचाली!

असा असेल पगार

अधिकृत अधिसूचनेनुसार, विविध ट्रेडमधील शिकाऊ पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा सात हजार रुपये वेतन दिले जाईल. 20 नोव्हेंबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. मात्र, आरक्षित श्रेणीतील अर्जदारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

loading image
go to top