esakal | सरकारी आणि खासगी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
sakal

बोलून बातमी शोधा

job Opportunities

सरकारी आणि खासगी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

sakal_logo
By
सुधीर काकडे

सरकारी किंवा खासगी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. पुढच्या काही दिवसांत या दोन्ही क्षेत्रात नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहेत. त्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. काही नोकऱ्यांसह, जायन्ट टेक आणि अ‍ॅमेझॉन या खासगी कंपन्यामंध्ये ५५००० रुपयांपर्यंत मासिक पगार असणाऱ्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या सर्व नोकऱ्यांबद्दलची सर्व माहिती.

DRDO मध्ये नोकरीच्या संधी

द डिफेन्स रिसर्च डेव्हलपनेंट ऑर्गनायझेशनने सेंटर फॉर आर्टिफिशीअल इंटेलिजन्स रोबोटीकमध्ये जुनियर रिसर्च फेलो पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज मागितले आहेत. १८ आणि १९ ऑक्टोबरला होणाऱ्या मुलाखतीवरुन या पदासाठीची निवडप्रक्रीया पार पडणार आहे. या मुलाखतीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना सुरुवातील २ वर्षांसाठी रुजु केले जाईल. या पदासाठी इच्छुक उमेदवार jrfcair2021@gmail.com या संकेत स्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज करु शकतात.

राजस्थान सबऑर्डिनेट मिनीस्ट्रीअल सर्व्हिस - २५० रिक्त जागा

राजस्थान सबऑर्डिनेट मिनीस्ट्रीअल सर्व्हिस सलेक्शन बोर्डात २५० रिक्त जागांसाठी नोकर भरती होणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार rsmssb.rajasthan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन उमेदवारी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार ८ ऑक्टोबरला अर्ज करु शकतात. या पदासाठी इच्छुक उमेदवार गणित, अर्थशास्त्र किंवा कम्युटर क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पद्विधारक असणे आवश्यक आहे.

द छत्तीसगड पब्लीक सर्व्हिस कमिशन - ५९५ जागा

द छत्तीसगड पब्लीक सर्व्हिस कमिशनने प्राध्यापकांच्या ५९५ जागांसाठी नोकर भरती होणार असल्याचे जाहीर केले. इच्छुक उमेदवार १३ सप्टेंबरपासून psc.cg.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करु शकतात. सदरील उमेदवार हा पी. एच. डी धारक आणि १० वर्ष शिकवण्याचा किंवा संशोधनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: UKMSSB करणार तंत्रज्ञच्या रिक्त जागांवर भरती!

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कार्पोरेश लिमीटेड - १७३ जागा

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कार्पोरेश लिमीटेडने १७३ रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. सिनीयर मेडिकल ऑफिसर, असिस्टंट राजभाशा ऑफिसर, जुनियर इंजिनीअर अणि सिनीयर अकाउंटंट पदासाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अ‍ॅमेझॉन करीअर फेअर

अ‍ॅमॅझॉनने नोकरिच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी व्हर्च्युअल करिअर फेअर आयोजित केला आहे. यामध्ये टेक जायंट कंपनीने ५५००० रुपये प्रति महिना पगाराच्या नोकरीसाठी अर्ज मागविले आहेत. १६ सप्टेंबरला अमॅझॉनच्या करिअर फेअरमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अनेक महत्वपुर्ण गोष्टी सांगण्यात येणार असुन हा कार्यक्रम मोफत असणार आहे.

द सिक्किम पब्लिक सर्व्हिस कमिशन - ११ जागा

द सिक्किम पब्लिक सर्व्हिस कमिशन ब्लॉक ऑफिसर या पदासाठी भरती घेणार असुन, या पदाच्या ११ जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार www.spscskm.gov.in. वर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

loading image
go to top