esakal | UKMSSB करणार तंत्रज्ञच्या रिक्त जागांवर भरती! 15 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

UKMSSB करणार तंत्रज्ञच्या रिक्त जागांवर भरती! 15 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची तारीख 15 सप्टेंबर, 2021 आहे.

UKMSSB करणार तंत्रज्ञच्या रिक्त जागांवर भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : उत्तराखंड वैद्यकीय सेवा निवड मंडळ (Uttarakhand Medical Services Selection Board - UKMSSB) ने 13 ऑगस्ट 2021 रोजी विविध राज्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) तंत्रज्ञांच्या (Technician) रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली होती. तथापि, अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची तारीख 15 सप्टेंबर, 2021 आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ukmssb.org ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

हेही वाचा: रेल्वेमध्ये दहावी व आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची संधी!

वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचनेनुसार, लॅब टेक्‍निशियन, ओटी टेक्‍निशियन, सीएसएसडी टेक्‍निशियन, रेडिओथेरपी टेक्‍निशियन, ईसीजी टेक्‍निशियन आणि इतर पदांसाठी एकूण 306 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार तपशीलवार अधिसूचना तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. श्रेणीनुसार रिक्त जागा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रियेचा तपशील अधिसूचनेमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा: देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत 'आयएपी'चे मोठे विधान!

जाणून घ्या पात्रता

असे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात, ज्यांनी माध्यमिक शिक्षण मंडळ, उत्तराखंडकडून विज्ञान शाखेची इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा शासनाने त्यांच्या समतुल्य म्हणून मान्यताप्राप्त कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पदांनुसार, शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहितीसाठी, आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकता. उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे आहे. वयाची गणना 1 जुलै 2021 नुसार केली जाईल. मात्र एससी, एसटी आणि राज्याच्या अशा प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे, जी सरकारकडून वेळोवेळी अधिसूचित केली जाऊ शकते.

अशी होईल निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. लेखी परीक्षेत 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की परीक्षा नकारात्मक मार्किंगवर आधारित असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापला जाईल. परीक्षेच्या पद्धतीबद्दल अधिक माहितीसाठी आपण वेबसाइटला भेट देऊ शकता.

loading image
go to top