एअर इंडियामध्ये नोकरीची संधी! अकाउंट्‌स व फायनान्स विभागात भरती

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी! अकाउंट्‌स व फायनान्स विभागात भरती
Air-India
Air-IndiaGallery
Summary

एआयईएसएल या एअर इंडियाच्या उपकंपनीने ज्युनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह, फायनान्स अँड असिस्टंट सुपरवायझर, अकाउंटंट्‌सच्या भरतीसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : एअर इंडियामध्ये (Air India) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) (AI Engineering Services Limited) या एअर इंडियाच्या उपकंपनीने ज्युनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह (Junior Executive), फायनान्स (Finance) अँड असिस्टंट सुपरवायझर (Assistant Supervisor), अकाउंटंट्‌सच्या (Accountants) भरतीसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार हैदराबाद (Hyderabad), कोलकता (Colcatta), दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील कंपनीच्या केंद्रातील दोन्ही पदांच्या एकूण 22 रिक्त पदांसाठी उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

Air-India
केंद्र सरकारच्या 'या' विभागातील विविध पदांसाठी पुन्हा संधी !

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीची अधिसूचना खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात किंवा एअर इंडिया airindia.in च्या अधिकृत वेबसाइटवर करिअर विभागात उपलब्ध करून घेऊ शकतात. अर्ज भरती अधिसूचनेतच दिला आहे. 28 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आवश्‍यक कागदपत्रे भरून आणि संलग्न करून हा अर्ज एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल), कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्‍स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली- 110003 या पत्त्यावर पूर्णतः सबमिट करावा. अर्जासोबत उमेदवारांना नवी दिल्ली येथे देय असलेल्या एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या नावाने 1500 रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जोडावा लागेल.

https://www.airindia.in/writereaddata/Portal/career/956_1_Notification-for-Junior-Executive-Assistant-Supervisor-Accounts.pdf या लिंकवरून भरती अधिसूचना आणि अर्ज डाउनलोड करा.

Air-India
पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये फिल्ड इंजिनिअर व सुपरवायझर पदांची भरती!

जाणून घ्या पात्रता

ज्युनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह - फायनान्स : उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) किंवा फायनान्समध्ये पूर्णवेळ एमबीए पदवीची आंतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. 1 ऑगस्ट 2021 पर्यंत कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

असिस्टंट सुपरवायझर - अकाउंट्‌स : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर संस्थेतून वाणिज्य पदवीधर असावा आणि संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा. 1 ऑगस्ट 2021 रोजी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com