खुशखबर! Emirates मध्ये 6,000 हून अधिक पदांसाठी भरती

Emirates
Emiratesesakal
Summary

दुबईची (Dubai) मुख्य वाहक एमिरेट्स (Emirates) येत्या काही महिन्यांत 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

दुबई : दुबईची (Dubai) मुख्य वाहक एमिरेट्स (Emirates) येत्या काही महिन्यांत 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील रिकव्हरीसह कंपनीचं नेटवर्क वाढवण्याची ही योजना आहे. सप्टेंबरमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सनं 3000 केबिन क्रू आणि 500 ​​विमानतळ सेवा कर्मचार्‍यांना दुबई कार्यालयात समाविष्ट करण्यासाठी एक जागतिक मोहीम सुरू केली होती.

दरम्यान, एअरलाइन्सला दुबई आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अतिरिक्त 700 ग्राउंड स्टाफची आवश्यकता आहे. यामध्ये केबिन क्रू, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, हेल्थ ऑफिसर, एचआर प्रोफेशनल्स, एअरपोर्ट सर्व्हिस एजंट यासह अनेक पदांचा समावेश आहे. एमिरेट्स आपल्या कर्मचार्‍यांना करमुक्त वेतन पॅकेज ऑफर करत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Emirates
खुशखबर! यूपी सरकार देणार 22 हजारांहून अधिक सरकारी नोकऱ्या

यापूर्वी सप्टेंबरमध्ये एअरलाइन्सनं 3,000 केबिन क्रू आणि 500 ​​विमानतळ सेवा कर्मचाऱ्यांच्या भरतीकरिता जगभरातून अर्ज मागविले होते. या नोकर्‍या दुबईस्थित असणार आहेत. या नोकरीबद्दल अधिक माहितीसाठी एमिरेट्समध्ये केबिन क्रू किंवा एअरपोर्ट सर्व्हिस एजंट म्हणून काम करण्यास इच्छुक असलेले कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर www.emiratesgroupcareers.com अर्ज करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com