

career
sakal
- प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर
करिअरमध्ये नोकरी करावी की व्यवसाय करावा हा प्रश्न स्वाभाविक आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने करिअरचे अलीकडचे निर्णय म्हणजेच कोणते शिक्षण घ्यावे, कोणता कोर्स करावा हे अवलंबून असतात. त्याचबरोबर शिक्षण पूर्ण झालेले असल्यास या मुद्द्यावरून मानसिक संभ्रम तयार होतो. कधीकधी आहे ती नोकरी सोडून व्यवसाय करू का, हा विचार अनेक जणांना सतावतो. त्यामुळे काही मुद्दे पाहुयात.