महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!

टीम ई-सकाळ
Thursday, 28 January 2021

महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरतीसाठी उमेदवार अभियांत्रिकी, पदविका, आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली / पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MAHA-Metro) १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यापैकी ८६ सुपरवायजर पदांसाठी आणि ५३ नॉन सुपरवायजर पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी महा मेट्रोने आणखी एक संधी दिली आहे. या पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी होती. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नाहीत, त्या उमेदवारांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत.

मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती​

महा मेट्रो (Maha-Metro) भरतीविषयी तपशीलवार माहिती महामेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार mahametro.org या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून भरतीची सविस्तर माहिती मिळवू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्ष प्रोबेशन पीरियडवर ठेवले जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. या ऑनलाइन परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात येतील.

UPSC परीक्षेत 'बॅकडोअर एन्ट्री'मुळे ट्रोल झालेल्या अंजली बिर्लाने दिलं उत्तर, काय म्हणाली वाचा​

महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरतीसाठी उमेदवार अभियांत्रिकी, पदविका, आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सुपरवायजर पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नॉन सुपरवायजर पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणाच्या आधारे वेगवेगळ्या श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट देण्यात येईल.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jobs in Mahametro last date to apply for vacancy extended