- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
मित्रवर्य राजूची अगदी तंद्री लागलेली होती. स्वविचारांच्या शोधात तो अगदी गढून गेला. प्रथम श्वासांवर लक्ष केंद्रित केले. श्वास आत येतो, बाहेर जातो. श्वास आत येताना नाकपुड्यांना जरा गार लागते, बाहेर पडताना किंचित कोमट. हा स्पर्श मोठा गंमतशीर असतो. पोटावर हात ठेवलेले असतील तर, हातांना पोटाचा भाताच जणू दर श्वासागणीक खाली वर जाताना जाणवतो. राजूची तंद्री जरावेळाने मी मोडली.