असली कसली परीक्षा! गाडीचे हेडलाइट लावून विद्यार्थ्यांनी सोडवले पेपर Intermediate Examination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharaja Harendra Kishore College

परीक्षा उशिरा सुरू झाल्यामुळं अंधार पडला आणि वीज नसल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला.

असली कसली परीक्षा! गाडीचे हेडलाइट लावून विद्यार्थ्यांनी सोडवले पेपर

बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा 'जुगाड' तंत्र दिसून आलंय. आजवर आपण सरकारी दवाखान्यात (Government Hospital) मेणबत्त्या आणि मोबाईलच्या उजेडात ऑपरेशन केल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. परंतु, आता अशाच पर्यायी व्यवस्थेत परीक्षा घेण्याचा मुद्दाही ऐरणीवर आलाय. मोतिहारीमध्ये वाहनांचे दिवे लावून इंटरमीडिएट परीक्षा (Intermediate Examination) पार पडली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणही दिलंय.

मोतिहारी (Motihari) येथील महाराजा हरेंद्र किशोर कॉलेजात (Maharaja Harendra Kishore College) दुसऱ्या शिफ्टमध्ये इंटरमीडिएटची परीक्षा होती. केंद्रीय अधीक्षक नवनीत कुमार झा (Navneet Kumar Jha) यांनी सांगितलं की, कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक केंद्र आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये सुमारे बाराशे उमेदवारांची परीक्षा होती. वरच्या हॉलमध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था बनवली होती; पण बसण्याची अडचण होती. त्यानंतर गदारोळ झाला. गोंधळ वाढल्यावर प्रशासनाला कळवण्यात आलं. त्यानंतर माहिती मिळताच सदरचे एसडीओ सौरव सुमन यादव आणि डीईओ संजय कुमार तिथं पोहोचले. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून साडेचारच्या सुमारास परीक्षा पुन्हा सुरू झाली, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: West Bengal : TMC च्या अध्यक्षपदी ममता बॅनर्जी यांची फेरनिवड

गोंधळामुळं परीक्षा दोन तासांहून अधिक उशिरानं सुरू झाली. सायंकाळी उशिरा डीएम शीर्षत कपिल अशोक हेही परीक्षा केंद्रावर (Examination Center) पोहोचले. त्यांनी केंद्र अधीक्षक बदलून डीईओंवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिलेत. परीक्षा उशिरा सुरू झाल्यामुळं अंधार पडला आणि वीज नसल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. त्यावर तिथं उपस्थित वाहनांचे दिवे लावून कशीतरी परीक्षा पूर्ण करण्यात आली. यासंदर्भात डीएम शीर्षत कपिल अशोक म्हणाले, परीक्षा केंद्रावर आसन व्यवस्थेमध्ये अडचण होती. नंतर दिवे लावून चाचणी घेण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय अधीक्षक बदलून निलंबनाच्या कारवाईचे आदेश डीईओंना देण्यात आले आहेत. वीज खंडित होणं आणि अंधार लक्षात घेऊन जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्याचं डीएमचं म्हणणं आहे.

हेही वाचा: आयुष्यभराची साथ सुटली! एकाच दिवशी लग्न अन् एकाच वेळी दोन भावांचा मृत्यू

जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर झालेल्या परीक्षेत पहिल्या शिफ्टमध्ये 8969 उमेदवारांनी परीक्षा दिली. तर, परीक्षेला 152 विद्यार्थी गैरहजर होते. दुसऱ्या शिफ्टमध्ये 34,482 उपस्थित, तर 583 उमेदवार गैरहजर होते. या दरम्यान विज्ञान, कला आणि गणित विषयाची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात आली. तर दुसऱ्या शिफ्टमध्ये कला शाखेच्या हिंदी विषयाची परीक्षा होती. पहिली शिफ्ट सकाळी 9:30 ते 12:45 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 1:45 ते 5 या वेळेत घेण्यात आली. परीक्षा सुरू होण्याच्या केवळ 10 मिनिटे आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी होती.

Web Title: Jugaad Technique Intermediate Examination Conducted By Lighting The Lights Of Vehicles In Motihari Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharGovernment hospital