West Bengal : TMC च्या अध्यक्षपदी ममता बॅनर्जी यांची फेरनिवड

West Bengal CM Mamata Banarjee
West Bengal CM Mamata Banarjeeesakal
Summary

24 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी काँग्रेसपासून वेगळं होऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती.

तृणमूल काँग्रेस पक्षातील (Trinamool Congress Party) अनेक नेत्यांमध्ये मतभेद असूनही, संघटनात्मक निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची TMC च्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलीय. पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यानं सांगितलं की, आज (बुधवार) पाच वर्षांनी टीएमसीमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या. यात ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिध्द केलंय.

टीएमसीचे सरचिटणीस पार्थ चटर्जी (Partha Chatterjee) म्हणाले, ममता बॅनर्जींच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नव्हता, त्यामुळं त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलीय. ममतांच्या समर्थनार्थ 48 प्रस्तावकांनी उमेदवारी दिली होती. या पदासाठी अन्य कोणाचंही नाव न आल्यानं त्यांची पक्षप्रमुखपदी बिनविरोध निवड झाली.

West Bengal CM Mamata Banarjee
UP Election : भाजपनं खासदाराच्या मुलाचं तिकीट कापलं

पक्षश्रेष्ठींमध्ये मतभेद असतानाही संघटनात्मक निवडणूक झाली. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी त्यांच्या नेत्यांना मतभेद सार्वजनिक करू नका, असे निर्देश दिले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत बॅनर्जींनी पक्ष आणि संघटनेकडे अधिक लक्ष देणार असल्याचं सांगितलं. 24 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी 1898 मध्ये काँग्रेसपासून (Congress Party) वेगळं होऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती.

West Bengal CM Mamata Banarjee
'पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी Surgical Strike करून दहशतवाद्यांचा खात्मा केला'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com