बारामतीच्या जेवढे नादाला लागले, तेवढे संपलेत : आमदार शिंदे

Shashikant Shinde vs Mahesh Shinde
Shashikant Shinde vs Mahesh Shindeesakal
Summary

आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी दिसून येत आहे.

सातारा : बारामतीच्या (Baramati) जेवढे नादाला लागले तेवढे संपलेत. राजकारणात ताजं उदाहरण बघायचं झालं, तर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु, ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. त्याच पध्दतीनं भविष्यात यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी शिवसेना (Shiv Sena) आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना दिलाय.

सातारा जिल्ह्यातील किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त (Kisanveer Sugar Factory Election) विविध तालुक्यात आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) आणि माजी आमदार मदन भोसले (Madan Bhosle) यांच्या गटाकडून सभा आयोजित केल्या जात आहे. या सभांमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे हे त्यांच्या-त्यांच्या गटात सहभागी होऊन एकमेकांवर टीका करताना दिसताहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच विरोधकांना xx लावण्याची भाषा केली. तर, आमदार महेश शिंदे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केलीय.

Shashikant Shinde vs Mahesh Shinde
मंदिर असो वा मशिद भोंगे उतरवलेच पाहिजेत; राकेश टिकैत यांचं समर्थन

शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्यात या निवडणुकीमुळं जोरदार खडाजंगी दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक त्यानंतर जिल्हा बॅंक निवडणूक आणि आता किसनवीर कारखान्याच्या निमित्तानं शिंदे-शिंदे दोन्ही नेते एकमेकांसमोर प्रचारादरम्यान उभे आहेत. महेश शिंदे यांनी जरंडेश्वर कारखान्यावरून अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांनीही महेश शिंदे यांना इशारा दिलाय.

Shashikant Shinde vs Mahesh Shinde
'मुस्लिमांच्या घरांची तोडफोड, जहांगीरपुरीत अत्याचार'; भाषणादरम्यान ओवैसींना आलं रडू

शशिकांत शिंदे म्हणाले, या राज्यात आदरणीय शरद पवार आणि अजित पवार दादा यांच्यावर आरोप केल्याशिवाय राजकारणात महत्व प्राप्त होत नाही. सातारा जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखान्या (Jarandeshwar Factory) संदर्भात टीका करण्यात येत आहे. ज्याचा राजकीय जन्म शरद पवार यांच्या आशीर्वादामुळं झाला. त्यांनी टीका करू नये. राजकारणाची पातळी सोडून टीका करतात त्यावेळी त्यांना जागा दाखविण्याची वेळ येईल. कुणी जास्त अहमपणा दाखवू नये. शरद पवार असे नेतृत्व आहे, ज्यांना देशाचे पंतप्रधान मानसन्मान देत असतात. तेव्हा येणाऱ्या भविष्य काळात आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com