Karnataka SSLC 10th Exam
esakal
बेळगाव : कर्नाटक माध्यमिक शिक्षण व मूल्यांकन मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून एसएसएलसी (दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Karnataka SSLC Exam Fee Hike) शुल्कात यंदा वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी पाच टक्के शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार यावर्षीच्या नोंदणीसाठीही नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.