बंगळूर : यंदाचा शैक्षणिक वर्षाच्या दहावी (SSLC Result) परीक्षा-१ चा निकाल आज जाहीर झाला. ज्यामध्ये एकूण ६६.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मंगळूर (दक्षिण कन्नड) जिल्हा ९१.१२ टक्के निकालासह राज्यात प्रथम स्थानावर असून, गुलबर्गा जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ४२.४३ टक्के लागला आहे.