esakal | उर्जा क्षेत्रात दर्जेदार करियरसह भक्कम वेतनही, जाणून घ्या सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

know career opportunities in energy sector Marathi article

भारतात आणि जगभरात सर्वत्रत येत्या काही काळीत उर्जा क्षेत्रात करियरच्या दृष्टिने संधी वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी जगभरात उपलब्ध आहेत.  

उर्जा क्षेत्रात दर्जेदार करियरसह भक्कम वेतनही, जाणून घ्या सविस्तर 

sakal_logo
By
टीम ईसकाळ

भारतात आणि जगभरात सर्वत्रत येत्या काही काळीत उर्जा क्षेत्रात करियरच्या दृष्टिने संधी वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी जगभरात उपलब्ध आहेत.  मात्र तुम्हाला या क्षेत्रात करियर करण्यासाठी विशेष आभ्यसक्रम शिकण्याची आवश्यकता असते. जसे  उर्जा क्षेत्रात बीटेक पॉवर, एमबीए ऑईल अँड गॅस, एमए एनर्जी इकॉनॉमिक्स, सौर ऊर्जा इत्यादी संबंधित अनेक अभ्यासक्रम आहेत. आज आपण उर्जा क्षेत्रात असलेल्या करियरच्या याच  संधीबद्दल जाणून घेणार आहोत. 

भारतातील ऊर्जा क्षेत्रात येत्या काही वर्षांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या संधीला गवसणी घालण्यासाठी  विद्यार्थ्यांना काही विशेष अभ्यासक्रम करण्याची आवश्यकता असेल. उर्जा क्षेत्रात बीटेक पॉवर, एमबीए ऑईल अँड गॅस, एमए एनर्जी इकॉनॉमिक्स, सौर उर्जा इत्यादींशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आहेत, पण येणाऱ्या काळात सर्वाधिक शक्यता सौरऊर्जेच्या क्षेत्रात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडावा. जर भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर ऊर्जा क्षेत्राला पुनरुज्जीवित केल्याशिवाय हा आकडा साध्य करणे कठीण आहे.
 

कोणते अभ्यासक्रम करता येतील

विद्यार्थी बीटेक इन पॉवर मॅनेजमेंट  , एमबीए इन पॉवर मॅनेजमेंट आणि एनर्जी लॉ यासारखे अभ्यासक्रम करू शकता. देशातील अनेक ठिकाणांवरून हे कोर्स करता येतात. देहरादूनमधील यूपीएस येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॅट आणि मॅट सारख्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. 
पुढे काय शक्यता आहेत

2000 ते 2019 या कालावधीत भारताच्या ऊर्जा क्षेत्रात 14.32 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाली आहे. सरकार या क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे, त्यामुळे येत्या काळात या क्षेत्रातील गुंतवणूक आणखी वाढेल. ज्यामुळे नोकरीची शक्यताही वाढेल. भारत सरकार नूतनीकरणक्षम उर्जा (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इ.) ची क्षमता 2022 पर्यंत 175 गीगावॅटपर्यंत वाढवणार आहे. यात 100 गीगावॅट सौर उर्जा आणि 60 गीगावॅट पवन उर्जा समाविष्ट आहे. त्याचबरोबर, भारताची कोळसा-आधारित क्षमता 2040 पर्यंत 191 गीगावॅट वरून 400 गीगावॅट  पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

गार किती मिळेल?

विद्यार्थ्याला सुरुवातीला पाच ते दहा लाखांचे पॅकेज मिळते, जे वार्षिक २० ते २५ लाखांपर्यंत वाढवले जाते. सुरुवातीला बर्‍याच विद्यार्थ्यांना वर्षासाठी १२ लाखांपर्यंतचे पॅकेज देखील मिळाले आहे.

loading image
go to top