esakal | फिजिकल एज्युकेशन क्षेत्रात करियरच्या संधी, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

physical education

फिजिकल एज्युकेशन क्षेत्रात करियरच्या संधी, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद - शारीरिक शिक्षणात करिअरला चांगली संधी आहे. तुम्ही शारीरिक शिक्षणात कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्या, संस्था आणि शाळांशी जोडू शकता. शारीरिक शिक्षण आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्तीचा विषय आहे. मात्र या क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तुम्हाला शारीरिक शिक्षणाचा कोर्स पूर्ण करावा लागेल. तर चला या क्षेत्रातील तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती देत आहोत…

शारीरिक शिक्षणाच्या कोर्ससाठी पात्रता काय?

शारीरिक शिक्षणात डिग्री किंवा डिप्लोमा कोर्ससाठी तुम्ही कोणत्याही शाखेत १२ उत्तीर्ण होणे जरुरीचे आहे. दुसरीकडे ज्या उमेदवारांजवळ शारीरिक शिक्षणात पदवीची डिग्री आहे त्यांनी शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करु शकतात.

कुठे करावा कोर्स

शारीरिक शिक्षणाशी संबंधिक कोर्स देशातील अनेक संस्थानमध्ये आहे. यात इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स ( दिल्ली), काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (पुणे), अॅमिटी स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स (नोएडा) या आहेत प्रमुख संस्था.

शारीरिक शिक्षणाशी संबंधित कोर्सेस

- सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन

- डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन

- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन

- मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन

काय आहेत करियरचे पर्याय

शारीरिक शिक्षणात कोर्स केल्यानंतर आता स्पोर्ट्स अॅकॅडमी, हेल्थ क्लब, शाळा, महाविद्यालये आदी संस्थांमध्ये नोकरी करु शकता. शारीरिक शिक्षणाच्या कोर्स नंतर तुम्ही अनेक प्रकारच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकता. जसे की...

१. शिक्षक

२. प्राध्यापक

३. स्पोर्ट्स मॅनेजर

४. फिजिकल ट्रेनर

- प्रशिक्षक