esakal | बारावीनंतर गणित विषय नकोय? मग या ५ कोर्सपैकी एकाची करा निवड आणि घडवा तुमच्या मनासारखं करिअर

बोलून बातमी शोधा

abc}

बारावीनंतर गणित विषयाशिवाय तुम्ही करू शकता असे काही कोर्स आज आम्ही तुमहाला सांगणार आहोत. ज्यांची गोडीही तुम्हाला लागेल आणि तुम्ही तुमचं करिअर घडवू शकाल.  

बारावीनंतर गणित विषय नकोय? मग या ५ कोर्सपैकी एकाची करा निवड आणि घडवा तुमच्या मनासारखं करिअर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आता पुढे काय? हा प्रश्न नुकतंच बारावी झालेल्या मुलामुलींना विचारला तर त्यांच्यासाठी हा प्रश्न सर्वात काहीं प्रश ठरेल. त्याचं कारणही तसंच आहे, अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर कोणता कोर्स निवडणार याबद्दल शंका असते. किंवा कुठल्या विषयाच्या भीतीमुळे अनेकजण बारावीनंतर शिक्षण सोडण्याचा विचार करतात. त्यात गणित विषय म्हंटलं की प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. बारावीनंतर गणित विषय असलेला कोर्स करणार नाही असंही अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. मात्र आता चिंता करू नका. बारावीनंतर गणित विषयाशिवाय तुम्ही करू शकता असे काही कोर्स आज आम्ही तुमहाला सांगणार आहोत. ज्यांची गोडीही तुम्हाला लागेल आणि तुम्ही तुमचं करिअर घडवू शकाल.    

आपण आपल्या करिअरमध्ये वाढ करू इच्छिता? तर या टिप्स वापरा आणि स्वत:ला बदला

हॉटेल मॅनेजमेंट 

बारावीनंतर आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर करू शकता. हा तीन वर्षाचा कोर्स आहे. या कोर्स दरम्यान मोठ्या हॉटेल्समध्ये इंटर्नशिप देखील करण्याची संधी मिळते. जे चांगले प्रदर्शन देतात त्यांना हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरमध्येही स्पेशलायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. 

यामध्ये करू शकता करिअर 

बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, फूड अँड बेव्हरेजेस प्रॉडक्शन बॅचलर, हॉटेल मॅनेजमेन्टमध्ये बीबीए, कॅटरिंग मॅनेजमेन्ट मध्ये बॅचलर, पाक कला मध्ये बीए (कूकिनरी आर्ट्स मध्ये बॅचलर), हॉटेल मॅनेजमेंटमध्ये  बीए.

ट्रॅव्हल अँड टुरिजम 

जर तुम्हाला फिरायला आणि एक्सप्लोर करायला आवडते असेल तर तुम्ही बारावीनंतर ट्रॅव्हल अँड टुरिजम हा कोर्स घेऊ शकता. विशेष म्हणजे या कोर्समध्ये गणित हा विषय नसणार आहे. 

यामध्ये करू शकता करिअर 

या क्षेत्रात तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेन्ट, बीएए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेन्ट, बीए इन ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेन्ट, बीए इन ट्रॅव्हल टुरिझम इत्यादी करू शकता.

बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेड

जर तुम्हाला बाजारपेठ समजून घ्यायची असेल, परदेशी व्यापार क्षेत्रात रस असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकेल. बारावीनंतर बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेडचीनिवड करा.. हा तीन वर्षाचा पदवीधर कोर्स आहे. यामध्ये रसद, आयात, निर्यात, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कायदा धोरण असे विषय असतील. ज्यामुळे तुम्ही ट्रेडिंग क्षेत्रात मोठं नाव मिळवू शकता.  

प्लास्टिक इंडस्ट्री क्षेत्रात करिअरच्या बऱ्याच संधी !...

इव्हेंट मॅनेजमेंट 

इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या मोठ्या पार्टी, सेमिनार, लाइव्ह शो, कॉर्पोरेट मीटिंग्ज, गेट टू गेदर, प्रेस कॉन्फरन्स आयोजित करतात. त्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची मागणीही वाढली आहे. 

यामध्ये करू शकता करिअर 

आपण या क्षेत्रातील इव्हेंट मॅनेजमेन्ट मध्ये बीबीए, इव्हेंट मॅनेजमेन्टमध्ये बॅचलर, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बीए सारखे कोर्स करू शकता.

बॅचलर ऑफ लॉ 

कायद्याचा अभ्यास करण्याचा अर्थ असा नाही की आपण केवळ वकील होऊ शकता. जवळपास सर्व मोठ्या कंपन्या सेक्रेटरीसाठी कायदेशीर सल्लागार नेमतात. जिथे सर्वोत्तम पगाराचे पॅकेज उपलब्ध आहे. देशाच्या विविध संस्थांमध्ये अनेक एकात्मिक विधी अभ्यासक्रमही चालविले जातात. जसे की बीकॉम एलएलबी, बीबीए एलएलबी, बीए एलएलबी इत्यादी कोर्समध्ये तुम्ही करिअर करू शकता. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ