पुणे - डिसेंबर महिना उजाडला तरीही काही विद्यार्थ्यांनी अद्याप इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यभरातील अशा विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे.