Latur News: ‘एमबीबीएस’च्या यादीत लातूरचा पुन्हा डंका! राज्यात सर्वाधिक बाराशे विद्यार्थ्यांची निवड
Education News: ‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील एमबीबीएस प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या निवड यादीत लातूरचे तब्बल १२०३ विद्यार्थी सामील झाले आहेत. काठिण्य पातळी वाढूनही लातूरची गुणवत्ता टिकून राहिल्याचे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर राज्याची ‘एमबीबीएस’साठीची पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. या यादीत आठ हजार शंभर जणांचा समावेश असून राज्यात सर्वाधिक एक हजार २०३ विद्यार्थी हे लातूरचे आहेत.