लिबरल आर्ट्समधील करिअर

लिबरल आर्ट्स हे बहुविद्याशाखीय शिक्षण आहे जे विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, तार्किक विचार आणि संवादकौशल्य विकसित करून विविध करिअरच्या संधी देते. पत्रकारिता, संशोधन, शिक्षण आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या मार्गांना उघडणारा हा अभ्यासक्रम आहे.
Why Liberal Arts Education Matters Today

Why Liberal Arts Education Matters Today

Sakal

Updated on

रिना भुतडा ( करिअर समुपदेशक)

नवी क्षितिजे

आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या युगात एकाच क्षेत्रात मर्यादित राहणे अपुरे ठरते. बहुविद्याशाखीय आणि चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी लिबरल आर्ट्स अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो. ‘काय शिकायचे?’ पेक्षा ‘कसे विचार करायचे?’ यावर भर देणारी ही शिक्षणपद्धती भारतातील बदलत्या शिक्षणप्रवाहात अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे . आजच्या नोकरीच्या बाजारात संवादकौशल्य, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि अनुकूलता यांसारख्या कौशल्यांना वाढती मागणी असल्याने या परिवर्तनात लिबरल आर्ट्स महत्त्वाचा घटक म्हणून उदयास येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com