LIC HFL Recruitment 2022 | एलआयसीमध्ये सहाय्यक पदांवर भरती; असा करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC HFL Recruitment 2022

LIC HFL Recruitment 2022 : एलआयसीमध्ये सहाय्यक पदांवर भरती; असा करा अर्ज

मुंबई : LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार lichousing.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे. या भरतीद्वारे एकूण ८० पदे भरण्यात येणार असून यामध्ये ५० पदे सहाय्यक आणि ३० पदे सहाय्यक व्यवस्थापकासाठी आहेत.

हेही वाचा: Financial Changes From 1st August : आजपासून लागू होत आहेत हे नवे आर्थिक बदल

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ८०

अर्ज शुल्क

सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये जमा करावे लागतील.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा कमी नसावी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

हेही वाचा: PM YASASVI scholarship : शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जा.

२. - त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.

३. - करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर, आता अप्लाय लिंकवर क्लिक करा.

४. - लिंकवर क्लिक केल्यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेत पुढे जा.

५. - फॉर्म भरल्यानंतर, अर्जाची फी भरा.

६. - पूर्ण प्रक्रियेनंतर, भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Web Title: Lic Hfl Recruitment 2022 Recruitment For Assistant Posts In Lic How To Apply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RecruitmentLife Insurance
go to top