

Understanding the True Purpose of Life
Sakal
डी. एस. कुलकर्णी (जीवनकौशल्य प्रशिक्षक)
जरा हटके
एक गोष्ट आठवते. एका अनुभवी, सुज्ञ माणसाची आणि त्याच्या आळशी मुलाची! एके दिवशी वडील त्यांच्या आळशी मुलाला नकाशा दाखवतात आणि खजिन्याच्या शोधार्थ पाठवतात. बरोबर थोडे तहानलाडू-भूकलाडू आणि थोडी-फार शिबंदी देतात. मुलाला उत्साह वाटतो; कारण खजिन्याचा मोह खुणावत असतो. अनेक संकटांना तोंड देत तो अनेक वर्षांनी खजिना असलेल्या गुहेत पोहोचतो. भरपूर खोदकाम करतो; परंतु खजिना काही त्याला सापडत नाही. काहीसा निराश होत तो घराकडे परततो. थकला भागला, कपडे फाटलेला, कातडी करपलेला असा त्याला बघून, त्या कनवाळू बापाच्या डोळ्यांत पाणी येते. वडील त्याला विचारतात, ‘‘तुला खजिना सापडला का रे बाळा?’’