

logical reasoning development in students
sakal
जयवंत बोरसे- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
पिसे आहेत, पण पक्षी नाही
उडतो, पण सजीव नाही
रंग शुभ्र, पण बगळा नाही!
सारे झिडकारून हाकलतात, पण कावळा नाही!
सांगा हे कोण आहे?
यासारख्या शाब्दिक कोडीवजा प्रश्नांची उत्तरे खूप कमी वेळा मिळतात. अशा गोष्टींचा शोध घेण्यासाठी खूप विचार करावा लागतो. प्रत्यक्ष जीवनव्यवहारात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करताना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. आपण नेहमीच ‘विचार'' हा शब्द सहजपणे वापरतो. सर्वसामान्यपणे क्रिकेट किंवा बुद्धिबळ खेळणारा खेळाडूदेखील खेळताना विचार करतो, तसेच थोड्या काळासाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि सहकारी अंतराळवीर यांना अवकाशयानातून परत पृथ्वीवर कसे आणता येईल? या आणि यांसारख्या अनेक बाबींचा विचार शास्त्रज्ञदेखील करतात. त्यावेळी विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यातून योग्य पर्यायांची निवड करायची असते. निर्माण झालेल्या प्रश्नांची किंवा समस्यांची सोडवणूक करताना सुरू झालेली विचारप्रक्रिया समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत सुरू असते.