
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) फेरीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय मिळाले (अलॉट) असून, यापैकी मंगळवारी तब्बल १८ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला.