

Maharashtra Board introduces a shorter SSC and HSC question paper format to reduce student stress, save costs, and support environmental sustainability.
esakal
दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील जवळपास ८ ते १० पानांच्या प्रश्नपत्रिका आता लवकरच इतिहासजमा होणार आहेत. होय, कारण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांची रचना बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेत सध्या १० ते ११ पानांच्या असलेल्या प्रश्नपत्रिका आता केवळ तीन ते चार पानांमध्ये मर्यादित करण्यात येणार आहेत. या बदलामुळे राज्य मंडळाच्या मुद्रण खर्चात तब्बल ६० टक्क्यांची बचत होणार असून, दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपये वाचतील, असा अंदाज आहे.