
School Policy
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र शाळा आता राहणार नाहीत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जाहीर केलेल्या नव्या शुद्धिपत्रकानुसार, एकाच कॅम्पसमध्ये चालणाऱ्या मुलींच्या आणि मुलांच्या स्वतंत्र शाळा आता सहशैक्षणिक संस्थांमध्ये विलीन करण्यात येणार आहेत.