

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ४२ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ४२ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील ९३.६१ टक्के म्हणजेच दोन लाख २७ हजार ०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळात सोलापूर जिल्ह्यातील ९४.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सोलापूरने बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. तर पुणे जिल्ह्यातील ९२.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकालात विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.७७ टक्क्यांनी जास्त आहे.
या परीक्षेसाठी एकूण दोन लाख ४४ हजार ३०८ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेस पाच हजार ४८८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ४७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून दोन हजार ६२३ विद्यार्थी (४७.९१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. एकूण नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ९२.६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय मंडळातून बारावीची परीक्षा दिलेल्या ९५.१५ टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९२.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. , अशी माहिती विभागीय अध्यक्ष डॉ. वंदना वाहूळ यांनी दिली.
पुणे विभागीय मंडळातील शाखानिहाय निकाल :
शाखा : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
विज्ञान : १,१७,१५४ : १,१६,८१३ : १,१४,७९९ : ९८.२७ टक्के
कला : ५६,३८७ : ५५,४४६ : ४८,२३२ : ८६.९८ टक्के
वाणिज्य : ६३,०९९ : ६२,७१७ : ५७,२९९ : ९१.३६ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ७,४३२ : ७,२८५ : ६,५५७ : ९० टक्के
जिल्हानिहाय निकाल (नियमित विद्यार्थी) -
जिल्हा : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
पुणे : १,२६,७९५ : १,२५,९५९ : १,१६,७६८ : ९२.७० टक्के
नगर : ६३,६६७ : ६३,००४ : ५९,४८६ : ९४.४१ टक्के
सोलापूर : ५३,८४६ : ५३,५३३ : ५०,७६८ : ९४.८३ टक्के
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल :
तालुका : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
आंबेगाव : २,६४४ : २,५३२ : ९५.७६ टक्के
बारामती : ७,५२७ : ६,८५८ : ९१.११ टक्के
भोर : २,००२ : १,९३३ : ९६.५५ टक्के
दौंड : ४,३२६ : ४,२०६ : ९७.२२ टक्के
हवेली : १०,१७० : ९,५२१ : ९३.६१ टक्के
इंदापूर : ५,७९८ : ५,५७६ : ९६.१७ टक्के
जुन्नर : ५,२४८ : ४,८४४ : ९२.३० टक्के
खेड : ४,७९५ : ४,३७० : ९१.१३ टक्के
मावळ : ४,०५० : ३,६६८ : ९०.५६ टक्के
मुळशी : २,५५१ : २,४०८ : ९४.३९ टक्के
पुणे शहर (पश्चिम) : २७,५९१ : २४,७१६ : ८९.५७ टक्के
पुरंदर : २,५८४ : २,३८६ : ९२.३३ टक्के
शिरूर : ५,५२४ : ५,२३३ : ९४.७३ टक्के
वेल्हा : ४७१ : ४५५ : ९६.६० टक्के
पुणे शहर (पूर्व) : २२,९७४ : २१,३०६ : ९२.७३ टक्के
पिंपरी-चिंचवड : १७,७०४ : १६,७५६ : ९४.६४ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.