HSC Supplementary Results 2023 : बारावीच्या पुरवणी परीक्षेत २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य मंडळातर्फे १८ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा, तर १८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती.
maharashtra hsc supplementary results 2023 results out on mahresult nic in 22 thousand 144 student pass
maharashtra hsc supplementary results 2023 results out on mahresult nic in 22 thousand 144 student passesakal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांमधील एकूण ७० हजार २०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील ३२.१३ टक्के म्हणजेच २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य मंडळातर्फे १८ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा, तर १८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती. तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २० जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार २० जुलै रोजी असलेल्या विषयांची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. त्यानंतर १७ व्या दिवशी राज्य मंडळाने बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

पुरवणी परीक्षा ४३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी दिली, त्यातील १२ हजार ८५० विद्यार्थी (२९.५६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यातील २५ हजार ४४९ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली असून त्यातील नऊ हजार २९४ विद्यार्थिनी (३६.५२ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.

विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी :

विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : निकालाची टक्केवारी

पुणे : ११,४५२ : ३,३६३ : २९.३६

नागपूर : ६,६९० : २,५१८ : ३७.६३

औरंगाबाद : ४,७२६ : २,३४६ : ४९,६४

मुंबई : २८,८६६ : ७,१६५ : २४.८२

कोल्हापूर : ४,५६३ : १,३७६ : ३०.१५

अमरावती : २,४७३ : ७९२ : ३२.०२

नाशिक : ५,४३६ : २,००१ : ३६.८१

लातूर : ४,१४८ : २,४२९ : ५८.५५

कोकण : ५५५ : १५४ : २७.७४

एकूण : ६८,९०९ : २२,१४४ : ३२.१३

उत्तीर्णतेची तुलनात्मक माहिती

तपशील : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ : जुलै-ऑगस्ट २०२२ : जुलै-ऑगस्ट २०२३

एकूण : २५.८७ टक्के : ३२.२७ टक्के : ३२.१३ टक्के

शाखानिहाय निकाल

शाखा : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : १४,६३२ : ५५.२३

कला : ४,१४६ : २०.५९

वाणिज्य : ३,०२८ : १४.६८

व्यवसाय अभ्यासक्रम : २८६ : १७.८६

आयटीआय : ५२ : ८१.२५

पुणे विभागीय मंडळाचा निकाल

जिल्हे : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : ८,२०३ : ८,०३० : २,०९८ : २६.१२

नगर : २,२०७ : २,१८० : ७३३ : ३३.६२

सोलापूर : १,२७१ : १,२४२ : ५३२ : ४२.८३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com