

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आतापर्यंत एक लाख ११ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये यंदा शासकीय आयटीआयमधील रिक्त जागांवर तब्बल ९०.७२ टक्के प्रवेश झाले आहेत. परवडणाऱ्या शुल्कात कौशल्य शिक्षण आणि अध्यापन पद्धती आणि रोजगारांच्या संधी यामुळे शासकीय आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्याकडून पसंती मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र २०२१ साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीनुसार राबविण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण आयटीआयमधील एक लाख ११ हजार ५२८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी तब्बल दोन लाख ८८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील शासकीय आयटीआयमध्ये ८३ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी, तर खासगी आयटीआयमध्ये २७ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आयटीआयच्या चौथ्या फेरीपर्यंत राज्यात जवळपास ५० टक्केच प्रवेश पूर्ण झाले. मात्र, समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी शासकीय संस्थांमधील रिक्त जागांना चांगला प्रतिसाद दिला. मागील वर्षापेक्षा शासकीय संस्थांमधील प्रवेशाची टक्केवारी यंदा वाढली असल्याची माहिती राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली आहे. मागील वर्षी शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची एकूण टक्केवारी ८३.८७ टक्के इतकी होती, तर यंदा प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९०.७२ टक्के इतकी आहे. यंदा ८३ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी शासकीय ‘आयटीआय’मधील प्रवेशाचा पर्याय निवडला आहे.
आयटीआय प्रवेशाला केंद्र सरकारकडून आणखी मुदतवाढ मिळाल्याने या प्रवेश संख्येत वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
कोरोना काळात अनेक विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक स्थिती कोलमडल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा पर्यायाएवजी कौशल्य प्रशिक्षणासह रोजगारक्षम अभ्यासक्रम असणाऱ्या आयटीआयला पसंती दिली जात आहे.
आयटीआय प्रवेशाची आकडेवारी :
-प्रवेश फेरी : शासकीय (२०२१) : खासगी (२०२१) : शासकीय (२०२०) : खासगी (२०२०)
- पहिली फेरी : २३,९७१ : ६,७६५ : २०,०६१ : ५,५२१
- दुसरी फेरी : १३,१२२ : २,२३३ : ९,८०३ : ३,२९९
- तिसरी फेरी : १२,२९४ : २,७४७ : ९,८८८ : २,८८९
- चौथी फेरी : ८,३९३ : १,३७२ : ९,४९८ : १,८२५
- समुपदेशन फेरी : २५,९६४ : ९,९५८ : २८,६१५ : ४,०६१
प्रवेशाच्या एकूण जागा :
आयटीआय : २०२१ : २०२० :
शासकीय : ९२,३११ :९२,८३६
खासगी : ५३,९४० : ५५,२६०
एकूण : १,४६,२५१ : १,४८,०९६
राज्यातील एकूण आयटीआय संस्था :
- शासकीय : ४१७
- खासगी : ५३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.