ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया येत्या गुरुवारपासून (ता. २१) सुरू होत आहे.
ITI Admission

ITI Admission

sakal

Updated on

पुणे - राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया येत्या गुरुवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू होईल, तर पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया एक जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com