MPSC Recruitment Update
esakal
ईश्वरपूर : राज्यातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात भरतीचे संकेत (Maharashtra Government Jobs) आहेत. सरकारी विभागांतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे भरण्याचा निर्णय होत असताना, दुसरीकडे ‘एमपीएससी’च्या परीक्षा व भरती प्रक्रियेतही महत्त्वपूर्ण बदलांचे संकेत आहेत. दीर्घकाळ प्रलंबित भरती, परीक्षा विलंब आणि नियमांतील अडथळे यावर उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.