

Maharashtra Professor Recruitment 2026: NET-SET Mandatory?
esakal
NET-SET Criteria for Assistant Professors: राज्यभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक तसेच सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी आता फक्त 'नेट' (NET) आणि 'सेट' (SET) परीक्षांचा निकष लागू करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असून, यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या नव्या धोरणामुळे महाविद्यालयांमधील भरतीसाठी पीएचडीची अट शिथिल होणार असली, तरी विद्यापीठ स्तरावरील भरतीसाठी पीएचडीचा नियम कायम राहणार आहे.