
पुणे, ता. १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेली दहावीची परीक्षा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १४ लाख ५५ हजार ४३३ म्हणजेच तब्बल ९४.१० टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा निकालात १.७१ टक्क्यांनी घसरला आहे.