सेनापती कापशी : दहावीची परीक्षा सुरू असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या पेपरदिवशी रक्षाविसर्जन करून तिने पेपर लिहिला. मनावरील आघात सहन करत बेनिक्रे (ता. कागल) येथील वैष्णवी बजरंग बुडके हिने ७६.२० टक्के गुण (10th Result) मिळवले.