esakal | SSC Result 2021 : दहावीचा निकाल रखडला; वेबसाईट डाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

ssc hsc exam

SSC Result 2021 : दहावीचा निकाल रखडला; वेबसाईट डाऊन

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (Maharashtra State Board Of Secodary And Higher Secondary Education) ऑनलाईन माहितीसह दहावी निकालाची साईड हँग झाली आहे. बारावीचा ऑनलाइन निकाल भरण्यासाठी मंडळाने आज शुक्रवारपासून (ता.१६) कामकाज सुरुवात केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी पोर्टल ओपन होत नसल्याने शिक्षक (Teacher) त्रस्त झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळ दहावीचा ऑनलाइन निकाल आज जाहीर करणार आहेत. बारावी अंतर्गत मूल्यमापन ऑनलाइन माहिती भरण्यास शुक्रवारी (ता.१६ ) सुरुवात करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी पहिल्याच दिवशी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन माहिती भरण्यासाठी पोर्टल सुरु केले. पोर्टल हँग होत आहे. यामुळे बारावी अंतर्गत मूल्यमापन निकाल भरण्यास पहिल्याच दिवशी अडचण निर्माण होत आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य मंडळाने ऑनलाइन माहिती भरण्यास सूचना दिल्या आहेत. परंतु सकाळपासून पोर्टल सुरु होत नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. (maharashtra state board portal hang, burden on teachers glp88)

हेही वाचा: पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते सील

जालना शहरातील शिक्षकांनी औरंगाबाद विभागीय मंडळात याबाबत विचारणा केली असता राज्य मंडळ पुणे यांना संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. दरम्यान काही प्राध्यापक मंडळींनी पुणे येथील राज्य मंडळात संपर्क केला असता आज दहावीचा निकाल आहे. यामुळेच कदाचित पोर्टल हँग होत आहे, असे सांगण्यात आले. राज्यात एकाच वेळी बारावी अंतर्गत मूल्यमापन ऑनलाइन कामकाज माहिती भरण्यात सुरुवात झाली असल्याने कदाचित पोर्टल हँग होत असल्याचे सांगण्यात आले. ऑफलाइन काम ऑनलाइन करण्यात प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शिक्षक पोर्टल कधी सुरुवात होईल, याची वाट पाहत आहे. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती भरण्यासाठी पोर्टल सुरु होण्याची वाट पाहत आहेत. पोर्टल कधी सुरुवात होईल यासाठी अनेकांना संपर्क केला असल्याचे राजूर येथील मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.संजय चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा: पावसाचा हाहाकार; शेतातील पिके पाण्यात, नदीलाही पूर

राज्य मंडळाने आजपासून बारावीअंतर्गत मूल्यमापन ऑनलाइन माहितीसाठी पोर्टल सुरु केले. परंतु सध्या सुरुच नसल्याने काहीच काम होत नाही.

प्रा.सुग्रीव वासरे, जिल्हाध्यक्ष, जुक्टा शिक्षक संघटना

loading image