esakal | पावसाचा हाहाकार; शेतातील पिके पाण्यात, नदीलाही पूर
sakal

बोलून बातमी शोधा

बदनापूर (जि.जालना) : डोंगरगाव - सायगाव शिवारात शेतात साचलेले पावसाचे पाणी. (छायाचित्र : आनंद इंदानी)

पावसाचा हाहाकार; शेतातील पिके पाण्यात, नदीलाही पूर

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : तालुक्यातील Badanapur रोषणगाव व शेलगाव मंडळाला गुरुवारी (ता. १५) पावसाने पुन्हा झोडपून काढले. तालुक्यातील रोषणगाव, अंबडगाव, नानेगाव, सायगाव, डोंगरगाव, ढोकसाळ, मांजरगाव, कुंभारी आदी गावांत पिके पाण्यात गेली आहेत. तर रोषणगाव व नानेगावच्या नदीला पूर आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बदनापूर तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस Rain ठाण मांडून आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पुन्हा रोषणगाव, अंबडगाव, नानेगाव, सायगाव, डोंगरगाव तर सेलगाव मंडळातील हलदोला, कुंभारी आणि मांजरगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतात खरीप पिके Kharip Crops पाण्यात गेली आहेत. प्रशासनाने तातडीने या भागात पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. नानेगाव, सायगाव व डोंगरगाव शिवारात गुरुवारी पावसाने तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे महागडी बियाणे, खते व औषधींचा खर्च करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. कपाशी Cotton, सोयाबीन Soybean, तूर Tur, बाजरी Millet या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.heavy rain damage crops, river overflow in badanapur tahsil of jalna district glp88

हेही वाचा: आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल

आमच्या डोंगरगाव - सायगाव शिवारात गुरुवारी पावसाने अक्षरशः थैमान माजवले. त्यात खरीप पिके पावसाच्या पाण्यात गेली आहेत. एकूणच अतिपावसाने पिके पिवळी पडून करपत आहेत.

- शिवनंदा घनघाव, शेतकरी, डोंगरगाव - सायगाव

नानेगाव शिवारात अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे बदनापूर - अंबड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या भागात वस्तुनिष्ठ पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.

प्रसाद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, नानेगाव

loading image